• Download App
    शाळेची घंटा वाजली ! आजपासून शाळा सुरू, मुख्यमंत्री साधणार ऑनलाईन संवादThe school bell rang! Starting school from today, CM will have online communication

    शाळेची घंटा वाजली ! आजपासून शाळा सुरू, मुख्यमंत्री साधणार ऑनलाईन संवाद

    दुपारी १२ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘ माझे विद्यार्थी माझी जबाबदारी ‘ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व शाळा , शिक्षक, मुख्यद्यापक यांच्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.The school bell rang! Starting school from today, CM will have online communication


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण, कोरोनामुळे राज्यातील बहुतेक शाळा मागील दीड वर्षांपासून बंद होत्या त्या आज अखेर सुरू होत आहेत.

    शाळा सुरू होणार या निमित्ताने दुपारी १२ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘ माझे विद्यार्थी माझी जबाबदारी ‘ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व शाळा , शिक्षक, मुख्यद्यापक यांच्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.विद्यार्थ्यांना सुद्धा हा कार्यक्रम दाखवण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.



    राज्य सरकारच्या सूचना

    १)मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावं.
    २)ज्या शाळांमध्ये स्कूल बस किंवा खासगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सीटवर केवळ एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
    ३)कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व आहे त्यामुळे वर्गातही योग्य शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    ४) वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
    ५)शाळेत प्रार्थना, स्नेहसंमेलन किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत.
    ६)जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरवण्यात येतील.
    ७) यासोबतच प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक नसावा, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
    ८) प्रत्यक्ष वर्गांसाठी जेवणाची सुट्टी नसेल, अशी सूचना देण्यात आली आहे.

    आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोस्तोव साजरा केला जाणार आहे.आज उपसंचालक, शिकणाधिकरी, प्राचार्य हे शाळांना भेटी देणार आहेत. सोबतच पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे केलेले स्वागत, नियोजनाचे फोटो सोशिल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले आहे.#शिक्षणोस्तोव या नावाने फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे फोटो पोस्ट करण्यात यावेत.

    मुंबईतील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांचं सॅनिटाईजेशन करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत 76 टक्के शिक्षकांचं लसीकरण झालं असून सर्वच शिक्षकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

    तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एसओपीचं पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

    The school bell rang! Starting school from today, CM will have online communication

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!