• Download App
    घरगुती गॅस दराचा भडका; 50 रुपयांनी वाढून सिलेंडर 1000 च्या घरात!! The rise in domestic gas prices; In the house of 1000 cylinder increased by 50 rupees

    LPG Cylinder Hike : घरगुती गॅस दराचा भडका; 50 रुपयांनी वाढून सिलेंडर 1000 च्या घरात!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल, कमर्शिअल गॅसच्या दरवाढीचा महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या सिलेंडरचे दर वाढले आहेत. १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० रुपयांची दरवाढ झाल्याने आता सिलेंडरची किंमत ९९९.५० रुपयांवर पोहोचली आहे. The rise in domestic gas prices; In the house of 1000 cylinder increased by 50 rupees

    दिल्लीत घरगुती गॅसचा दर ९९९ रुपये ५० पैसे इतका झाला आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. २२ मार्चला यापूर्वी ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आले नव्हते.

    १ एप्रिलला कमर्शिअल एलपीजी सिलेंडरचे दर २५० रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर, मे महिन्यात त्यामध्ये १०२.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा फटका बसला आहे.

    The rise in domestic gas prices; In the house of 1000 cylinder increased by 50 rupees

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली