विशेष प्रतिनिधी
नागपूर : उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या उर्जा मंत्रालयाच्या बळावर निवडून आलेले युवक कॉँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष कुणाल राऊत यांनी आता ताकद दाखविण्यार असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेस संपली असे म्हणणाऱ्यांना आता युवा शक्ती आपली ताकद दाखविणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.The President of the Youth Congress, who was elected on the Power of his father, will show his strength
महाराष्ट्र प्रदेश युवक क्रॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत यांची निवड झाली आहे. ते म्हणाले, आगामी सर्व निवडणुकीत कॉंग्रेसकडून ५० टक्के जागांवर युवा निवडणूक लढणार आणि जिंकूनही दाखविणार. युवक कॉंग्रेसतर्फे जनतेच्या मदतीसाठी २४ तास हेल्पलाइन सुरु केली जाणार आहे.
युवक काँग्रेस संघटना आणखी मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा उघडण्यात येणार आहे. या शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक बुथवर पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. युवा शक्तीची ताकद दाखवण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे.
आपल्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वातच आता प्रत्यक्ष मैदानात लढायचे असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसला संपविण्याचे काम सुरु आहे, या विरोधात आता एकजूट होऊन लढा देण्याची गरज अशोक धवड यांनी व्यक्त केली.
The President of the Youth Congress, who was elected on the Power of his father, will show his strength
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले भारातच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक
- NCP – AIMIM Alliance : एमआयएमशी आघाडीचा निर्णय महाराष्ट्र पातळीवर होऊ श
- The Kashmir Files : शरद पवारांकडून फारुख अब्दुल्लांची पाठराखण; सिनेमावर सामाजिक वातावरण बिघडविण्याचा आरोप!!
- गोवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २३ ते २५ मार्च दरम्यान
- Goa Dr. Pramod Sawant : भाजप देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; डॉ. प्रमोद सावंतांचे मुख्यमंत्रीपदाचे सूतोवाच