• Download App
    मुख्यमंत्रीपदाचा कारभार अजित पवारांकडे द्यावा ; प्रसाद लाड यांनी केली मागणीThe post of Chief Minister should be given to Ajit Pawar; Demand made by Prasad Lad

    मुख्यमंत्रीपदाचा कारभार अजित पवारांकडे द्यावा ; प्रसाद लाड यांनी केली मागणी

    आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावा अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पसंती दर्शवली आहे.The post of Chief Minister should be given to Ajit Pawar; Demand made by Prasad Lad


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. तब्ब्येत ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित नव्हते.त्यामुळे विऱोधी पक्षातल्या नेत्यांनी टीका केली आहे.यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावा अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पसंती दर्शवली आहे.

    आमदार प्रसाद लाड म्हणाले की , आता ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली, यावरुन लक्षात येत आहे की मुख्यमंत्री काय अधिवेशनाला येत नाहीत.



    पुढे प्रसाद लाड म्हणाले की , आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की मुख्यमंत्र्यांनी लवकर बरे व्हावे. आम्ही प्रार्थना देखील करत आहोत की मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर बर वाटावं आणि आम्ही प्रथना करत राहणार आहोत. पण राज्याचा कारभार गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अधांतरी आहे, कोणताही महत्त्वाचा निर्णय होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थोडा आराम करावां आणि मुख्यमंत्रिपदाचा कारभार आदित्य ठाकरे किंवा अजित पवार यांच्याकडे द्यावा.

    The post of Chief Minister should be given to Ajit Pawar; Demand made by Prasad Lad

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य