विशेष प्रतिनिधी
बीड : मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र चालवण्याचा अधिकार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा पाहून बाळासाहेबांना देखील वाईट वाटत असेल, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे-पवार सरकारवर केली. The plight of ST employees Sad to see Balasaheb
गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच काम बंद आंदोलन सुरू आहे. तर बीड मध्ये मागील ४ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला आमदार विनायक मेटे यांनी आज भेट दिली. दरम्यान यावेळी मेटेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र चालवण्याचा काही अधिकार नसल्याचं म्हटले आहे.
दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागतय. त्यामुळे दिवंगत बाळासाहेबांना देखील मराठी माणूस दिवाळीच्या काळात अडचणीत असल्याचे पाहून वाईट वाटत असेल, असे देखील यावेळी विनायक मेटे म्हणाले आहेत. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी एसटी आगारातच काळी दिवाळी साजरी केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आमदार मेटे यांनी यावेळी फराळ वाटप करून केला आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा; बाळासाहेबांना दुःख
- आमदार विनायक मेटे यांची सरकारवर टीका
- उद्धव यांना महाराष्ट्र चालविण्याचा अधिकार नाही
- दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ
- एसटी आगारातच काळी दिवाळी साजरी
The plight of ST employees Sad to see Balasaheb
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल