• Download App
    कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा आधारस्तंभ हरपला; सुधीर कलिंगण यांचे आजाराने निधन । The pillar of Dashavatari Natyakshetra in Konkan was lost; Sudhir Kalingan dies due to illness

    कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा आधारस्तंभ हरपला; सुधीर कलिंगण यांचे आजाराने निधन

    वृत्तसंस्था

    सिंधुदुर्ग : कोकणातील दशावतारी नट सुधीर कलिंगण (वय ५३ ) यांचे निधन झाले. त्यामुळे कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. The pillar of Dashavatari Natyakshetra in Konkan was lost; Sudhir Kalingan dies due to illness

    सुधीर कलिंगण हे श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे मालक होते.सुविख्यात दशावतारी नट बाबी कलिंगण यांचे ते सुपूत्र होते. आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे त्यांनी पुढे नेला. पारंपरिक दशावतारी कलेचे आधुनिकीकरण करणाऱ्या नवीन नाट्यनिर्मिती सादर करून त्यांनी ठसा उमटवला.



    दशावतारी राजा म्हणून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. त्यांना दशावताराचा लोकराज म्हणून ओळखले जात असे. तसेच दशावतार कला सातासमुद्रापार नेण्यात कलिंगण यांचा मोठा वाटा आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील रहिवासी असलेल्या सुधीर कलिंगण यांच्या निधनाने नेरूर व सिंधुदुर्ग शोककळा पसरला आहे.

    The pillar of Dashavatari Natyakshetra in Konkan was lost; Sudhir Kalingan dies due to illness

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस