• Download App
    खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण | The one who threw the oxygen plant in the village Many are going crazy

    खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण

    The one who threw the oxygen plant in the village Many are going crazy

    वृत्तसंस्था

    अहमदनगर : खेड्यामध्ये साडे पाच कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला लोकांनी दोन वर्षांपूर्वी वेड्यात काढले होते. पण, आज तोच माणूस ऑक्सिजन पुरवठा करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवत आहे. The one who threw the oxygen plant in the village Many are going crazy

    बजरंग पुरी, असे त्यांचे नाव आहे. ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी पुरी यांनी 3 कोटी रुपये कर्ज काढलं होत. दोन वर्षात चित्र बदलले. आता तर कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज भासत आहे. ऑक्सिजनची मोठी मागणी आहे. पुरी हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील नांदूरघाट या लहानशा गावचे. शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.



    निवृत्तीनंतर म्हणजे 2019 मध्ये त्यांनी अहमदनगरच्या चिखलेनवाडी या खेड्यामध्ये ऑक्सिजन निर्मितीचा उद्योग सुरू केला. अहमदनगरमधला हा ऑक्सिजन निर्मिती करणारा एकमेव प्लांट आता महत्वाची भूमिका बजावत आहे.

    ऑक्सिजनसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे फक्त वीज आहे. त्यामुळं त्यांनी हा उद्योग सुरू केला. सुरुवातीला फक्त रात्री ते उत्पादन करत. फक्त 100 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती सुरू केली. औद्योगिक क्षेत्राला ते हा ऑक्सिजन पुरवठा करत होते.

    पण 2020 च्या सुरुवातीला कोरोनामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली. त्यामुळं दिवसरात्र उत्पादन सुरू केलं. सध्या रोज 500 जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. अहमदनगरबरोबरच औरंगाबाद, बीड, जालनालाही ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

    The one who threw the oxygen plant in the village Many are going crazy

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!