वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत चालला होता. परंतु, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ( ता.२३) कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. १०,०६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे The number of corona victims are increasing in the state! ; 10,066 people Affected due to Corona on Wednesday
तर ११०३२ जणांना घरी सोडले आहे. मंगळवारी ८ हजार ४७० नवीन रुग्णांची नोंद झाली होती आणि ९ हजार ४६ रुग्णांना डिस्चार्ज दिला होता. आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,५३,२९० झाली आहे.
बुधवारी १६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के एवढे आहे.