विशेष प्रतिनिधी
मुंबई : दीप्ती नवल 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री. 3 फेब्रुवारी रोजी 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1953 रोजी अमृतसर येथे झाला. करिअरची सुरुवात रंगभूमी कलाकार म्हणून केली. आर्ट फिल्म्सची नॉन ग्लॅमरस नायिका म्हणून दीप्ती नेहमीच ओळखल्या जातात. दीप्ती नवल आणि फारुख शेख यांची जोडी खूप गाजली. दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट केले. The non-glamorous heroine of Art Films Deepti Naval; Today is the 70th birthday
‘चष्मे बद्दूर’ ची अभिनेत्री म्हणून लोकप्रियता
दीप्तीच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी चित्रकार व्हावे पण दीप्ती यांची आवड थिएटरमध्ये होती. दीप्ती यांनी करिअरची सुरुवात 1978 मध्ये आलेल्या जुनून या चित्रपटातून केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते आणि या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र आजही त्या ‘चश्मे बद्दूर’ची नायिका म्हणून ओळखल्या जातात. या चित्रपटात त्यांनी सेल्स गर्लची भूमिका साकारली होती जी डिटर्जंट पावडर विकायची.
गंभीर अभिनयासाठी ओळख
अभिनयाचा कोर्स न करता इंडस्ट्रीत आल्या आणि आज दीप्ती गंभीर अभिनयासाठी ओळखल्या जातात. 80 च्या दशकात ‘प्यारी लडकी, नेक्स्ट – डोअर गर्ल’ सारख्या भूमिका केल्या होत्या. चित्रपटांतील त्यांच्या भूमिका समीक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला.
दीप्ती नवल यांनी 1985 मध्ये चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी लग्न केले. 1991 मध्ये दीप्ती आणि प्रकाश झा यांनी मुलगी दिशा हिला दत्तक घेतले. पण 17 वर्षांनंतर त्यांचे लग्न तुटले आणि दोघांनी घटस्फोट घेतला. लवकरच प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा मुलगा विनोद पंडित त्यांच्या आयुष्यात आला. काही वेळातच दीप्ती नवल आणि विनोद पंडित यांची एंगेजमेंट झाली पण कॅन्सरमुळे विनोद पंडित यांचे निधन झाले. सध्या, दीप्ती अविवाहित आहेतट आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक चॅरिटेबल ट्रस्ट देखील चालवतात.
The non-glamorous heroine of Art Films Deepti Naval; Today is the 70th birthday
महत्त्वाच्या बातम्या
- 370 कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 1700 काश्मिरी पंडितांना सरकारी नोकरी!!
- गोव्यात राष्ट्रवादीची 24 स्टार प्रचारकांची मोठ्ठी यादी, पण नेमके उमेदवार तरी किती??
- समाजवादी पक्ष म्हणजे सडलेला माल, कयामतच्या दिवसापर्यंत सत्तेवर येणार नाही, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाची बोटे तुपात; महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ
- देशातील तीन कोटी लोकांना लखपती कसे बनविले, पंतप्रधानांनी सांगितला मार्ग
- गलवानवर मोठा खुलासा : चकमकीत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, मात्र केला फक्त ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा