विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाला दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचा इशारा दिलेला आहे, अन्यथा मनसे स्वतः रस्त्यांवर उतरून या विरोधात आंदोलन करणार आहे. गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवाची लगबग सुरु होणार आहे. एका बाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन आता कुठे तरी पूर्वपदावर येत आहे, परंतु महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. जर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तर रस्त्यांवर उतरून मनसे खड्यांना मनपा आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची नावे देणार असल्याचा निर्वाणीचा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. The names of the officers in Navi Mumbai will be “Roshan”; Commissioner, MNS will give the names of engineers to the pits !!
नवी मुंबईतील खड्डे दोन दिवसांत बुजवा!
नवी मुंबईकरांना सालाबादाप्रमाणे यावर्षीही आपली वाहने रस्त्यांवरून चालवताना खड्डयातून मार्ग काढावा लागत आहे. मुंबई शहराच्या अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य दिसत असून कित्येक वेळा नवी मुंबईकरांना अपघाताला देखील सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र आपल्याला पहावयास मिळत आहे. नवी मुंबईसारख्या प्रगत आधुनिक आणि नियोजित शहराला खड्डयांचे लागलेले ग्रहण सुटताना दिसत नाही. या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत गजानन काळे यांनी महापालिका प्रशासनाला दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचा इशारा दिला आहे.
सुमार दर्जाचे काम
प्रत्येक वर्षी नवी मुंबईतील करदात्या सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळण करत करोडो रुपये खर्च करून निविदा मागवून रस्ते बनवले जातात, बनविलेले रस्ते एकाच पावसात त्यांची दयनीय अवस्था होते, त्यावर खड्डे पडलेले असतात. असे सुमार दर्जाचे काम महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या डोळ्यादेखत सुरु असते तरी त्यांच्याकडून संबंधीत कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. पुन्हा त्याच कंत्राटदारांना महापालिकेकडून बक्षिसी स्वरूपात अधिकची कामे दिली जातात. हे अधिकारी व कंत्राटदारांचे गौडबंगाल जो पर्यंत नवी मुंबईतून हद्दपार होत नाही, तो पर्यंत नवी मुंबई वासियांना चांगल्या दर्जाचे रस्ते मिळणार नसल्याचे मत गजानन काळे यांनी व्यक्त केले.
The names of the officers in Navi Mumbai will be “Roshan”; Commissioner, MNS will give the names of engineers to the pits !!
महत्त्वाच्या बातम्या
- अफझलखान वधाच्या पोस्टरवरून झालेल्या मिरज दंगलीचा खटला ठाकरे- पवार सरकारकडून मागे; १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- Letter to PM CM : पत्रास कारण की, आमचे दात येत नाहीयेत; चिमुकल्यांना मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच भन्नाट उत्तर ; म्हणाले..
- शाळा सुरू करण्यापूर्वी लोकल प्रवासाचा प्रश्न सोडवा , शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
- Mumbai 26/11 Terror Attack : अर्णब गोस्वामीच्या डिबेट शोमध्ये-पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच 26/11 हल्ला घडवून आणला- इम्रान खान यांच्या पक्षाची कबुली
- SWACHH BHARAT MISSION 2.0 : पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन मोहिमांचा शुभारंभ ; कोट्यवधी खर्च करुन नागरिकांना होणार मोठा फायदा ; वाचा काय आहे मोहिम…