• Download App
    मंत्र्यांच्या बंगल्यांना चक्क गड, किल्ल्यांची नावे; आदित्य ठाकरेंना ‘रायगड’, वड्डेटीवारांना ‘सिंहगड'। The names of the forts, the names of the forts; Aditya Thackeray to 'Raigad', Vaddetiwaran to 'Sinhagad'

    मंत्र्यांच्या बंगल्यांना चक्क गड, किल्ल्यांची नावे; आदित्य ठाकरेंना ‘रायगड’, वड्डेटीवारांना ‘सिंहगड’

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बंगल्यांना गड आणि किल्ल्यांची नावे देण्यात येणार आहेत. The names of the forts, the names of the forts; Aditya Thackeray to ‘Raigad’, Vaddetiwaran to ‘Sinhagad’

    आतापर्यंत हे बंगले क्रमांकांवरून ओळखले जात होते. आता त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या नावाने ते ओळखले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी मुंबई शहराच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवले आहे. या बंगल्यांची नावं बदलून त्यांना गडकिल्ल्यांची नावं देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे.

    बंगल्यांची बदललेली नावे

    अ ३ – शिवगड (जितेंद्र आव्हाड)

    अ ४ – राजगड (दादा भुसे)

    अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी)

    अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे)

    अ ९ – लोहगड –

    बी १ – सिंहगड (विजय वड्डेटीवार)

    बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)

    बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)

    बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)

    बी ५ – विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)

    बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)

    बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)

    क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)

    क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)

    क ३ – पुरंदर

    क ४ – शिवालय

    क ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)

    क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)

    क ७ – जयगड

    क ८ – विशाळगड

    The names of the forts, the names of the forts; Aditya Thackeray to ‘Raigad’, Vaddetiwaran to ‘Sinhagad’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?