• Download App
    अनैतिक संबंधांमधून जन्मलेल्या मुलीचा आईनेच केला खून । The mother of a girl born out of wedlock committed murder

    अनैतिक संबंधांमधून जन्मलेल्या मुलीचा आईनेच केला खून

    अनैतिक संबंधामधून जन्मलेल्या मुली बाबत नातेवाईकांना काय सांगायचे या भीतीतून महिलेने स्वतःच्या तीन महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अपहरणाचा बनाव रचत स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलाच्या मदतीने हा मृतदेह गोणीमध्ये भरून बंडगार्डन पुलावरून नदीमध्ये फेकून दिला. The mother of a girl born out of wedlock committed murder


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अनैतिक संबंधामधून जन्मलेल्या मुली बाबत नातेवाईकांना काय सांगायचे या भीतीतून महिलेने स्वतःच्या तीन महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अपहरणाचा बनाव रचत स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलाच्या मदतीने हा मृतदेह गोणीमध्ये भरून बंडगार्डन पुलावरून नदीमध्ये फेकून दिला.

    अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आई आणि तिला मदत करणाऱ्या मुलाच्या जबाबात विसंगती आढळून आली. पोलिसांनी तो धागा पकडून तपास करीत गुन्हा उघड केला.

    येरवडा पोलिस ठाण्यातील एका वसाहतीमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. ही महिला मूळची अहमदनगरची आहे. पुण्यात भावाकडे राहायला आहे. ती घटस्फोटित असून तिला 13 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. अनैतिक संबंधातून तिने तीन महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता.



    शुक्रवारी आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी या संदर्भात संबंधित महिला आणि तिच्या तेरा वर्षांच्या मुलीकडे चौकशी केली. या दोघांकडून मिळालेल्या माहितीमध्ये विसंगती होती. पोलिसांनी कसून केलेल्या तपासात तीन महिन्याच्या बालिकेचा खून आईने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्या मुलाला ताब्यात घेतल्याचे येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी सांगितले.

    पोलीस तपासात ही घटना उडघडकीस आल्यानंतर पोलिसानी हा मृतदेह शोधला आणि त्यावर स्वतः अंत्यसंस्कार केले. अटक करण्यात आलेल्या महिलेने स्वतःच्या तीन महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या अपहरणाचा बनाव रचला. तिने स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलाच्या मदतीने हा मृतदेह गोणीमध्ये भरून बंडगार्डन पुलावरून नदीमध्ये फेकून दिला होता. अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर ही आई आणि तिला मदत करणाऱ्या मुलाच्या जबाबामुळे विसंगती आढळून आल्यानंतर पोलिसांनी तो धागा पकडून तपास करीत हा गुन्हा उघड केला.

    या महिलेचे ज्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते त्याचे पूर्ण नाव देखील तिला सांगता येत नाही. या प्रेमसंबंधांमधून ती गरोदर राहिली. तिने शेगाव येथे मुलीला जन्म दिला. गावाकडे तिचा एक भाऊ राहतो. मुलीला घेऊन ती पुण्याला आली. मुलीला सांभाळताना तिला समाज आणि नातेवाईक काय म्हणतील याची भीती वाटत होती. मृतदेहाच्या अंत्यविधी विषयी आरोपी महिलेचा भाऊ आणि मुलीच्या मामाकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी आम्ही या मृतदेहाचे काही करणार नसल्याची भूमिका घेतली.

    The mother of a girl born out of wedlock committed murder

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ