विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या आणि काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आपापसात राजकीय तडजोड करून विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे. भाजपच्या दोन जागांच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूरची एक जागा द्यावी लागली आहे.The meeting of the Legislative Council from Nagpur between the grandparents and former leaders of BJP
पण नागपुरात मात्र भाजपचे आजी-माजी नेतेच एकमेकांच्या समोर आले आहेत. मुंबई आणि धुळे – नंदुरबार या दोन जागांच्या बदल्यात भाजपने काँग्रेसला कोल्हापूरची जागा देऊ केली. ती काँग्रेसने स्वीकारली. त्यामुळे तिथे सतेज उर्फ बंटी पाटील यांची निवड बिनविरोध झाली आहे.
भाजपने आपले उमेदवार अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले आहे. भाजपच्या नेतृत्वाला कोल्हापूरपेक्षा धुळे – नंदुरबारची अमरिश पटेल यांची जागा आणि मुंबईची राजहंस यांची जागा महत्त्वाची वाटली त्यामुळे मला दुपारी दीड वाजता देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यानुसार आपण अर्ज मागे घेत आहोत, असे अमोल महाडिक यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी महाडिक गट इथून पुढच्या काळात भाजपच्या चिन्हाखाली निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे.
नागपूरमध्ये मात्र माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेलेले छोटू भोयर यांच्यात आमना – सामना होणार आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. नागपुरात मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्यात राजकीय तडजोड झाली नाही. त्यामुळे ही लढत भाजपच्याच दोन आजी-माजी नेत्यांमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
छोटू भोयर यांनी भाजपच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेच आमचे उमेदवार असतील असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता छोटू भोयर हे जरी काँग्रेसचे उमेदवार असले तरी गेली 34 वर्षे ते भाजपमध्ये होते, त्यांचा सामना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी होणार आहे.
The meeting of the Legislative Council from Nagpur between the grandparents and former leaders of BJP
महत्त्वाच्या बातम्या