• Download App
    मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगदा खोदण्याचा अखेरचा टप्पा पूर्ण The last phase of tunnel digging in the Mumbai Coastal Road project is complete

    मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील बोगदा खोदण्याचा अखेरचा टप्पा पूर्ण

    मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतुक कोंडीमुक्त होणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतुक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी)  ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खोदण्याचा (ब्रेक थ्रू) अखेरचा टप्पा कळ दाबून करण्यात आला.  प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम ‘मावळा’ यंत्राने बोगदा खोदण्याचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला. The last phase of tunnel digging in the Mumbai Coastal Road project is complete

    मुंबईसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आपण पूर्ण केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातील बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आपण स्थानिक कोळीवाड्यातील भुमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे. समुद्रातील दोन खांबामधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटर्सचे केले आहे. सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे नेला आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

    मुंबईत असे महत्वाचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यांना केंद्राकडून विशेषतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे. मुंबई ही आंतरराष्ट्रीय नगरी आहे. आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रय़त्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या किनारा रस्ता प्रकल्पाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    The last phase of tunnel digging in the Mumbai Coastal Road project is complete

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस