या मुदतीपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. नवीन माहितीनुसार, पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. The last date for linking of PAN Aadhaar extended has been extended to 30th June 2023
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. याबाबत पीआयबीने ट्विट केले आहे की, करदात्यांना काहीसा दिलासा देत आधारला पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ होती. पण जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता हे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ३ महिन्यांची मुदत दिली जात आहे. या मुदतीपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
The last date for linking of PAN Aadhaar extended has been extended to 30th June 2023
महत्वाच्या बातम्या
- सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद; पण महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी तेच काँग्रेसकडे आले; अशोक चव्हाणांचे शरसंधान
- ‘’मुंबई महानगरपालिकेतील ८ हजार ४८५ कोटींच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा’’ आशिष शेलारांनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवले पत्र!
- भगतसिंह कोश्यारींचा हेतू महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, तर समाजप्रबोधनाचा होता – मुंबई उच्च न्यायालय
- ‘’जीवनात हीच कामं आपल्याला आशीर्वादरूपी मदत करतात’’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केल्या भावना!