• Download App
    अपहरण झालेला मुलगा सुखरूप बालेवाडी जवळ सुखरूप|The kidnapped boy is safe near Balewadi

    अपहरण झालेला मुलगा सुखरूप बालेवाडी जवळ सुखरूप

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अपहरण झालेला चार वर्षांचा मुलगा बालेवाडी जवळ पुनवळे परिसरात पोलिसांना सुखरूप दिसून आला. स्वर्णव उर्फ डुग्गू सतिश चव्हाण असे त्याचे नाव आहे.त्याला तेथेच सोडून अपहरणकर्त्याने पळ काढला असावा.The kidnapped boy is safe near Balewadi

    या चार वर्षीय मुलाचे 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. तो घराजवळून पायी जात असताना त्याला पळवण्यात आले. मागील आठ दिवसांपासून पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस त्याला शोधत होते.



    स्वर्णव याचे एका अॅक्टिव्हा सारख्या दिसणाऱ्या गाडीवरुन अपहरण करण्यात आले होते. हा प्रकार बालेवाडी पोलीस चौकीजवळ मंगळवार दि. 11सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडला होता. त्याचे वडील डॉक्टर आहेत.

    घरासमोर हा मुलगा खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र त्याचे अपहरण नेमक्या कोणत्या कारणातून झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

    The kidnapped boy is safe near Balewadi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा