• Download App
    The Kashmir Files : नथुरामची भूमिका करणारे अमोल कोल्हे म्हणतात, "द काश्मीर फाईल्स"मुळे वातावरण बिघडते!!|the Kashmir Files: Amol Kolhe who plays Nathuram says, "The Kashmir Files" spoils the atmosphere

    The Kashmir Files : नथुरामची भूमिका करणारे अमोल कोल्हे म्हणतात, “द काश्मीर फाईल्स”मुळे वातावरण बिघडते!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : 1990 च्या दशकातील काश्मीर मधील हिंदू नरसंहाराचे सत्य दाखवणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” वरून देशात वादंग सुरू असताना वेगळ्या सिनेमात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणारे नट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी “द काश्मीर फाईल्स” सिनेमामुळे देशातले वातावरण बिघडते आहे, अशी टिप्पणी केली आहे.The Kashmir Files: Amol Kolhe who plays Nathuram says, “The Kashmir Files” spoils the atmosphere

    डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केल्याच्या मुद्यावरून मध्यंतरीच्या काळात जोरदार वाद झाला होता. त्यावेळी स्वत: डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कला वेगळी आणि राजकारण वेगळे अशी भूमिका घेतली होती.



    मात्र, आता “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हे आणि शरद पवार यांची भूमिका बदललेली दिसून येत आहे. “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा फक्त हिंदूंवरचे अत्याचार दाखवतो. पण काश्मीरमध्ये मुसलमानांवर अत्याचार झाले ते दाखवत नाही, असे टीकास्त्र दोन्ही नेत्यांनी सोडले आहे.

    त्यातही नथुराम गोडसे यांच्या भूमिकेचे समर्थन करणारे शरद पवार “द काश्मीर फाईल्स” बद्दल मात्र वेगळी भूमिका घेताना दिसतात. त्यांनी नथुरामच्या भूमिकेच्या मुद्द्यावर अमोल यांचे समर्थन केले आणि आता काश्मिर पोलीस वरून समाजात तिढा निर्माण होत असल्याची टीका केली आहे. अमोल कोल्हे यांनी देखील पवारांचीच री ओढली असून “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा देशात एक विशिष्ट नॅरेटिव्ह सेट करतो आहे. तो चुकीचा आहे, असे शरसंधान सोडले आहे.

    इतिहासात जे घडले त्यावरून वर्तमानात वाद निर्माण करणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण याच अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका साकारल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली सुरुवातीला त्यांनी भूमिकेचे समर्थन केले पण नंतर मात्र एक दिवसाचे उपोषण करून पश्चाताप व्यक्त केला. आता त्यांनी “द काश्मीर फाईल्स” वरून वेगळी भूमिका मांडल्यानंतर त्या विषयी देखील सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे.

    The Kashmir Files: Amol Kolhe who plays Nathuram says, “The Kashmir Files” spoils the atmosphere

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस