• Download App
    गायिका सावनी शेंडे आणि हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णींना ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ जाहीर | The Indian Classical Singer Swani Shende Will Awarded By Swargiya Vinay Chitra Smriti Sannman

    गायिका सावनी शेंडे आणि हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णींना ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ जाहीर

    • प्रसिध्द ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण..

    विशेष प्रतिनिधी.

    पुणे : विनय चित्राव यांच्या नावानं देण्यात येणारा ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे आणि प्रसिध्द हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. चित्राव यांच्या व्दितीय स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमात प्रसिध्द ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती वीरेंद्र चित्राव आणि विभव चित्राव यांनी दिली आहे. The Indian Classical Singer Swani Shende Will Awarded By Swargiya Vinay Chitra Smriti Sannman



    प्रत्येकी रूपये ११ हजार रुपये, शाल, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता विष्णू विनायक स्वरमंदिर, गांधर्व महाविद्यालय, पुणे इथं होणार आहे.

    या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने आणि गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

    पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सावनी शेंडे आणि मिलिंद कुलकर्णी यांची विशेष सुश्राव्य मैफल होणार आहे. गांधर्व महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक विनय चित्राव यांचं दोन वर्षांपूवी करोना मुळे निधन झालं होतं.

    The Indian Classical Singer Swani Shende Will Awarded By Swargiya Vinay Chitra Smriti Sannman

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!