• Download App
    आनंदाची बातमी : मुंबईत ज्येष्ठांना उद्यापासून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस ; आठ लाख जणांचे लसीकरण।The good news : Covishield vaccine Second Dose will be Given to Senior Citizen Of Mumbai from tomorrow

    आनंदाची बातमी : मुंबईत ज्येष्ठांना उद्यापासून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस ; आठ लाख जणांचे लसीकरण

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईत ज्येष्ठांना उद्यापासून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्यास महापालिका सुरुवात करणार आहे. ज्या 60 वर्षांवरील ज्येष्ठांनी पहिला लसीचा डोस 12 आठवड्यापूर्वी घेतला आहे. त्यांचे लसीकरण होणार आहे. मुंबईत 11 लाख ज्येष्ठ आहेत. यातील 8 लाख जणांना लसीचा पहिला डोस दिला आहे. The good news : Covishield vaccine Second Dose will be Given to Senior Citizen Of Mumbai from tomorrow

    मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. परंतु, दररोज 50 ते 60 मृत्यू होत आहेत त्यात ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक आहे. दिव्यांगांनाही लस देण्यात येणार आहे. शिवाय 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही देण्यात येणार आहे.



    मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कस आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ, 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यानंतर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू केले होते. मात्र डोसअभावी लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. केवळ 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात आहे.

    The good news : Covishield vaccine Second Dose will be Given to Senior Citizen Of Mumbai from tomorrow

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस