Thursday, 8 May 2025
  • Download App
    क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय आज होणार; १७ दिवसापासून अटकेत|The future of Aryan Khan in the cruise drugs case The decision will be made today; Detained for 17 days

    क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय आज होणार; १७ दिवसापासून अटकेत

    वृत्तसंस्था

    मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी १७ दिवसांपासून तो अटकेत आहे.The future of Aryan Khan in the cruise drugs case The decision will be made today; Detained for 17 days

    त्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात आज सुनावणी होणार आहे. आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. विशेष एनडीपीएस कोर्टानं गेल्या सुनावणीत जामीन अर्जावरील निर्णय सुरक्षित ठेवला होता.



    एनसीबीनं १४ ऑक्टोबर रोजी कोर्टात आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. आर्यन मादक पदार्थांचं सेवन करतो. तसेच कारवाई दरम्यान, ड्रग्सही जप्त केले होते, असे एनसीबीने कोर्टात सांगितले होते.

    एनसीबीनं त्यांना तीन ऑक्टोबर रोजी अटक केली होती. नार्कोटिक्स ड्रग्स अॅन्ड सायकॉट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट (एनडीपीएस) प्रकरणी विशेष न्यायाधीश व्हीव्ही पाटील यांच्या न्यायालयात आर्यन खान आणि दोन इतर आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

    आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकून अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक केली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

    The future of Aryan Khan in the cruise drugs case The decision will be made today; Detained for 17 days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण