विनायक ढेरे
नाशिक : बंगालमध्ये जिहादींच्या हिंसाचाराचे थैमान, विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून हिंदू समाजाचा लढा उभारलाय. एवढेच काय पण लव जिहादसारख्या सामाजिक कुप्रथेवर देखील विश्व हिंदू परिषद ताकदीने प्रहार करते आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंदजी परांडेंनी द फोकस इंडियाला दिलेल्या खास मुलाखतीत केले. मिलिंदजी परांडे यांनी या वेळी पश्चिम बंगालमध्ये इस्लामी जिहादींनी चालविलेल्या अत्याचारांची संतापजनक कहाणी सांगितली. The focus india exclusive; Vishwa Hindu Parishad Mahamantri Milindji Parande`s strong interview on bengal jihadi violance and love jihad
- पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीनंतर ३७०० गावांमध्ये इस्लामी जिहादींनी हिंसाचार, बलात्कार, कत्तली माजविल्यात पण विश्व हिंदू परिषदेने धैर्याने आणि नेटाने काम केले आहे आणि हिंदू समाजाने तेथे लढा उभारला आहे.
- विश्व हिंदू परिषदेने धैर्याने जे काम उभे केले आहे, त्यामुळे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगापुढे हिंदू समाजाने आपले गाऱ्हाणी मांडली आहे. अन्यथा इस्लामी जिहादींविरोधात बोलायची कोणाची हिंमतच झाली नसती. मानवी हक्क आयोगाकडे १७ हजार आवेदने आली आहेत. त्यामध्ये बंगालच्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची संतापजनक वर्णने आहेत.
- निवडणूकीनंतर बंगालमध्ये हिंसाचार झालाच नसल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. पण विश्व हिंदू परिषदेने तो हाणून पाडलाय. राज्य सरकारला न्यायालयात आता जिहादी हिंसाचाराच्या प्रत्येक घटनेचे प्रत्युत्तर द्यावेच लागेल.
- लव जिहाद प्रकरणात विश्व हिंदू परिषद आक्रमकपणे काम करते आहे. दरवर्षी दोन ते अडीच हजार मुलींना, ज्यांना लव जिहादमुळे त्रास सहन करावा लागलाय, त्यांना हिंदू समाजात परत आणून त्यांना जीवनयापन पुन्हा सुरू करण्यासाठी विश्व हिंदू परिषद सर्व प्रकारची मदत करते आहे.
- मेन स्ट्रीम मीडिया याची दखल घेत नाही. पण हिंदू समाजातला मोठा घटक लव जिहाद विरोधात अतिशय बळकटपणे उभा आहे. एक स्ट्राँग अंडरकरंट तयार होतो आहे.