विशेष प्रतिनिधी
पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती आज गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत मोठ्या दिमाखात मंडपात येऊन विराजमान झाला. शास्त्रोक्त पद्धतीने त्याची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याआधी मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पारंपारिक वाद्यांच्या साथीने जल्लोषात मिरवणूक काढली. कोरोनामुळे गेली दोन वर्षे उत्सवावर बंधने आली होती. यंदा ही बंधने नसल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले. The first kasba of Mana is a splendid welcome to Ganapati