वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन अॅपल स्टोअरमध्ये जल्लोष सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतातील पहिले अॅपल स्टोअर आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू झाले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. टीम कुकने स्टोअरचे दरवाजे उघडून औपचारिक उद्घाटन केले. बाहेर येताना, टिम कुकने वाट पाहणाऱ्या लोकांना हस्तांदोलन करून आणि नंतर नमस्कार करून अभिवादन केले. The first Apple retail store in the country customers were welcomed by Tim Cook
आज अॅपल स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत स्वतः टीम कुक करत आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नवीन अॅपल स्टोअरमध्ये जल्लोष सुरू आहे. Apple मधील कर्मचारी उत्साही आहेत. टीम कुकने स्वतः सर्व स्टाफमध्ये उत्साह निर्माण केला आहे. टीम कुकसोबत सेल्फी काढण्याची लोकांमध्ये स्पर्धा दिसत होती. Apple चे मुंबईतील स्टोअर २८ हजार स्क्वेअर फूट परिसरात असून, रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात आले आहे.
उद्घाटनानंतर टीम कुकने ट्विट केले की, मुंबईत दिसणारी ऊर्जा अविश्वसनीय आहे. येथील अॅपल स्टोअरचा उद्देश आपली उत्पादने थेट लोकांना विकणे, त्यांच्या सेवा आणि इतर उपकरणे उपलब्ध करून देणे हा आहे. स्टोअरची रचनाही उत्तम प्रकारे तयार करण्यात आली आहे. आजच्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनाच्या साक्षीसाठी लोक दूरवरून मुंबईत पोहोचले होते. महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई व्यतिरिक्त गुजरात, राजस्थानमधूनही लोक तिथे पोहोचले.
The first Apple retail store in the country customers were welcomed by Tim Cook
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी येण्याऐवजी वेणूगोपाल मातोश्रीवर आले; उद्धव यांनाच सोनिया दरबारी हजर राहण्याचे निमंत्रण देऊन गेले!!
- नितीश कुमारांच्या राज्यात वाळू माफियांची वाढली मुजोरी; महिला अधिकाऱ्यास मारहाण करत, फरटपत नेले!
- Karnataka Elections 2023 : भाजपाने उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर; सर्वच राजकीय पक्षांनी कसली कंबर!
- राहुल गांधी नव्हे, वेणुगोपाल मातोश्रीवर; सावरकर ते राष्ट्रवादीतील संभाव्य फूट मुद्द्यांवर चर्चा!!