• Download App
    मुख्यमंत्र्यांचे असेही धाडस, कॅसिनो चालविण्याचा आरोप झालेल्या मंत्र्याला काढण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळच केले बरखास्त, अकार्यक्षमांनाही वगळले|The entire cabinet was sacked to remove the minister who was accused of running a casino, bold decision by CM

    मुख्यमंत्र्यांचे असेही धाडस, कॅसिनो चालविण्याचा आरोप झालेल्या मंत्र्याला काढण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळच केले बरखास्त, अकार्यक्षमांनाही वगळले

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री तुरुंगात असूनही कारवाई होत नाही. मात्र, आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंत्रीमंडळातील कलंकित मंत्र्यांना काढण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळच बरखास्त केले. मंत्रीमंडळाच्या फेरबदलात २४ पैकी १२ मंत्र्यांना डच्चू दिला. विशेष म्हणजे यातील एका मंत्र्यावर कॅसिनो चालविल्याचा आरोप आहे.The entire cabinet was sacked to remove the minister who was accused of running a casino, bold decision by CM

    सरकारची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून रेड्डी यांनी हा निर्णय घेतला. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री कोडाली व्यंकटेश्वर राव यांच्यावर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कॅसिनो चालवित असल्याचा आरोप आहे. विरोधी तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) त्यांना यावरून लक्ष्य केले होते.



    टीडीपी नेत्यांनी पोलिस तक्रार करण्याचा आणि सेंटरला भेट देण्याचा प्रयत्न केला तेव्हा राव यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यावर राव यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावले. मंत्र्यांच्या वागणुकीबद्दल आणि विरोधी पक्षांबद्दल त्यांनी वापरलेल्या अयोग्य भाषेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला.

    त्याचबरोबर अकार्यक्षम मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांनी घणचा रस्ता दाखविला आहे. उर्जा , वन आणि पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री बालिनेनी श्रीनिवास रेड्डी म्हणाले, कोरोनाच्या काळात आम्हाला निधीची कमतरता होती. त्यामुळे कामगिरी दाखविता आली नाही.

    The entire cabinet was sacked to remove the minister who was accused of running a casino, bold decision by CM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा