• Download App
    नाका-तोंडातून स्वॅब नव्हे तर थुंकीतूनही होणार कोरोना चाचणी|The corona test will be done not only through the nose-mouth swab but also through the sputum

    नाका-तोंडातून स्वॅब नव्हे तर थुंकीतूनही होणार कोरोना चाचणी

    कोरोना चाचणी करण्यासाठी नागपूरच्या निरीने ( राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्र) नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज लागणार नाही. निरीच्या या संशोधनाला आयसीएमईआरने ही मान्यता दिली आहे. कोरोना चाचणीच्या या पद्धतीमुळे वेळ आणि खचार्चीही बचत होणार आहे.The corona test will be done not only through the nose-mouth swab but also through the sputum


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : कोरोना चाचणी करण्यासाठी नागपूरच्या निरीने ( राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्र) नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

    त्यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज लागणार नाही. निरीच्या या संशोधनाला आयसीएमईआरने ही मान्यता दिली आहे. कोरोना चाचणीच्या या पद्धतीमुळे वेळ आणि खचार्चीही बचत होणार आहे.



    कोरोनाचाचण्यांचा रिपोर्ट येण्यास 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागत आहे. अशावेळी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना उपचार घेण्यास उशीर होत आहे. अनेक रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने जीवही गेलाय.

    यावर पर्याय म्हणून नागपूरच्या निरी संस्थेने नवीन पर्याय शोधून काढलाय. सलाईनमध्ये वापरलं जाणारे ग्लुकोज तोंडात घेऊन त्याची गुळणी करून ती थुंकी एका बाटलीमध्ये घेतली जाते. त्या थुंकीचा वापर आरटीपीसीआर टेस्ट साठी केला जातो.

    निरी संस्थेनं दिलेल्या या पयार्यामुळे वेळ आणि खचार्ची बचत होणार आहे. कारण 3 तासात कोरोना चाचणीचा अहवाल मिळू शकणार आहे. तसेच नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्यासाठी लागणाºया किटचीही गरज भासणार नाही.

    सुरुवातीला देशभरातील पाचशे लॅबमध्ये या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीमध्ये चाचणीसाठी लोकांना रांगेत लागण्याची गरज नाही.

    शिवाय वेळही वाचेल आणि संसर्ग होण्याचाही धोका कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर ही पद्धत अंमलात आणल्यास चाचण्या सुलभ आणि सुकर होण्यास मदत होईल, असं या संस्थेकडून सांगण्यात येत आहे.

    The corona test will be done not only through the nose-mouth swab but also through the sputum

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस