• Download App
    मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा ; आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मागणीThe Chief Minister should give this relief to the people of Nagpur; Ashish Deshmukh made the demand in a letter to the Chief Minister

    मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा ; आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मागणी

    मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.The Chief Minister should give this relief to the people of Nagpur; Ashish Deshmukh made the demand in a letter to the Chief Minister


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मोठा निर्ण घेतला आहे. यानुसार मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजधानीला मुंबईला दिलेला न्याय ते उपराजधानी नागपूरला का लागू करत नाही असा प्रश्न काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.



    आशिष देशमुख यांनी नागपूरकरांना देखील न्याय द्यावा अशी पत्रात मागणी केली आहे.मुंबईमधील अल्प मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबियांना दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नागपुरातही असे हजारो कुटुंब आहे ज्यांना अशाच निर्णयाची अपेक्षा आहे.

    तसेच गेल्या काही वर्षात नागपूर शहरात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो कुटुंब स्थायिक झाले आहे.दरम्यान त्या सर्वांचे घर ५०० वर्ग फूट पेक्षा कमी आकाराचे आहे.त्यामुळे त्यांनादेखील मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशी मागणी केली आहे.

    The Chief Minister should give this relief to the people of Nagpur; Ashish Deshmukh made the demand in a letter to the Chief Minister

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस