ULC Scam : यूएलसी घोटाळ्यात राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा आरोपी दिलीप घेवारे याला ठाणे पोलिसांनी सुरतेतून अटक केली आहे. मीरा भाईंदर पालिकेत नगररचनाकार राहिलेल्या दिलीप घेवारेला आज सकाळी ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली. दिलीप घेवारे हा मागच्या दोन आठवड्यांपासून फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने सत्र न्यायालयात अर्जही केला होता. विशेष म्हणजे त्याच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी होण्याआधीच ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 28 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Thane Police Arrested Mastermind Of ULC Scam Dilip Ghevare From Surat
विशेष प्रतिनिधी
ठाणे : यूएलसी घोटाळ्यात राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा आरोपी दिलीप घेवारे याला ठाणे पोलिसांनी सुरतेतून अटक केली आहे. मीरा भाईंदर पालिकेत नगररचनाकार राहिलेल्या दिलीप घेवारेला आज सकाळी ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली. दिलीप घेवारे हा मागच्या दोन आठवड्यांपासून फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने सत्र न्यायालयात अर्जही केला होता. विशेष म्हणजे त्याच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी होण्याआधीच ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 28 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे यूएलसी घोटाळा?
2000 मध्ये मीरा भाईंदरमध्ये यूएलसी म्हणजेच कमाल जमीन धारणा कायदा लागू झाला. तथापि, हा कायदा लागू नसल्याचे बनावट दाखले देऊन शासनाची हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाली. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नगररचनाकार दिलीप घेवारे असल्याचा आरोप आहे. मीरा भाईंदर पालिका हद्दीत अनेक जमीन यूएलसीच्या अंतर्गत येत असूनही त्या कायद्यात बसत नसल्याचे बनावट दाखले ठाणेमधल्या यूएलसी विभागाने दिले होते. त्यामुळे शासनाला देय असणाऱ्या बहुसंख्य घरांची परस्पर विक्री झाली. यामुळे शासनाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी 2012 मध्ये ठाणे पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती.
इतके दिवस आरोपी मोकाट कसे?
बनावट दाखले देणाऱ्या यूएलसी विभागाचे अपर जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या विभागात सहायक नगररचनाकार दिलीप घेवारे व सत्यवान धनेगावे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. तेव्हा तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वरदहस्तामुळे दिलीप घेवारे सुटल्याचा आरोप होऊ लागला. याच काळात 4 विकासकांसह 5 जणांना अटकही झाली होती. ते सर्व सध्या जामिनावर आहेत. परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर आणि आता ते चर्चेत आल्यावर पुन्हा नव्याने कारवाई सुरू झाली. अखेर सत्यवान धनेगावे याच्यासह आणखी दोन जणांना अटक झाली. ते सध्या तुरुंगात आहेत. आणि आता मुख्य सूत्रधार घेवारेला अटक झाल्याने आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Thane Police Arrested Mastermind Of ULC Scam Dilip Ghevare From Surat
महत्त्वाच्या बातम्या
- Microsoft Windows 11 : केव्हा होणार रिलीज, कुणाला मिळेल फ्री अपग्रेड, जाणून घ्या सबकुछ
- Reliance AGM 2021 : तीन वर्षांत 10 लाख नोकऱ्या, 15 हजार कोटींची गुंतवणूक, मुकेश अंबानींचे टॉप 10 निर्णय
- DRDO चे आणखी एक यश, सबसॉनिक क्रूज अण्वस्त्रवाहू निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- ‘द वायर’ विरोधात एका महिन्यात दुसऱ्यांदा FIR, पवित्र कुराण पोलिसांनी नाल्यात फेकल्याचे खोटे वृत्त दिल्याने कारवाई
- अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, सोसायटीच्या चेयरमनलाच दिली जिवे मारण्याची धमकी