• Download App
    सर्व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे गोविदांचे आश्वासन; तरीही दहीहंडीची परवानगी ठाकरे – पवार सरकारने नाकारली|Thackeray - pawar govt denied permission for Dahi Handi

    सर्व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे गोविदांचे आश्वासन; तरीही दहीहंडीची परवानगी ठाकरे – पवार सरकारने नाकारली

    प्रतिनिधी

    मुंबई – सर्व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे आश्वासन देणाऱ्या मुंबई, ठाण्यातल्या मंडळांनाही दहीहंडीची परवानगी ठाकरे – पवार सरकारने सरसकट नाकारली आहे. त्यामुळे दहीहंडीच्या उत्साहावर सलग दुसऱ्या वर्षी पाणी फिरले आहे.Thackeray – pawar govt denied permission for Dahi Handi

    दहीहंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविदांचे डबल कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आश्वासन ठाणे आणि मुंबईतल्या सर्व दहीहंडी मंडळांनी ठाकरे – पवार सरकारला लेखी दिले आहे. तरीही सरकारच्या कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार ठाकरे – पवार सरकारने मर्यादित स्वरूपात देखील दहीहंडी साजरी करायला परवानगी नाकारली आहे.



    दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो, असे टास्क फोर्सने सांगितले असल्याचे ठाकरे – पवार सरकारने स्पष्ट केले आहे. हा उत्सव जागतिक स्तरावर टिकावा अशी बाजू मंडळांच्या समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांपुढे स्पष्ट केले.

    एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार गोविंदा पथकांवर लक्ष कसे ठेवणार?, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांवरील ताण वगैरे पाहता हे शक्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    ठाकरे – पवार सरकारची परवानगी नसल्याने दहीहंडीचे आयोजन न करण्याची भूमिका घेतल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे. परंतु, त्यावर तीव्र स्वरूपाच्या राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत.

    Thackeray – pawar govt denied permission for Dahi Handi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!