विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तपास यंत्रणेच्या, ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी त्यांना लपविण्यात ठाकरे – पवार सरकार मशगूल आहे, अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
१०० कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर अटकेची तलवार लटकत आहे. आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने सरकारची आव्हान याचिक फेटाळून लावली.Thackeray-Pawar government is busy in to Save and hide Anil Deshmukh
माझ्या माहितीप्रमाणे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार व्यूहरचना आखत होते. अनिल देशमुख जर तपास यंत्रणेच्या ताब्यात गेले आणि वाझे वसुली गँगच्या पैसे वाटपाची माहिती बाहेर आली तर आपलं काय होणार? , अशी चिंता त्यांना भेडसावत आहे, असे ते म्हणाले.
- अनिल देशमुख यांना लपविण्याचा खटाटोप
- हायकोर्ट, सुप्रीम कोर्टने याचिक फेटाळली
- अनिल देशमुख यांच्यावर अटकेची तलवार
- ठाकरे- पवार यांच्यात खलबतांची चाहूल
- देशमुख अटकेत जाताच पितळ उघडे पडणार
- वसुली गँगच्या पैसे वाटपाची माहिती चव्हाट्यावर
- आपले कसे होणार याची नेत्यांना वाटतेय चिंता