प्रतिनिधी
मुंबई : “इंदिरा गांधी यांच्या सरकारने माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात डांबले होते माझ्या काकू 18 महिने तुरुंगात होते आम्ही तुरुंगाला घाबरणारे लोकं नाही. जनतेच्या हितासाठी आम्ही लढतच राहू,” असे जोरदार प्रत्युत्तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधिमंडळात दिले.Thackeray-Pawar do not know from which house I come
गेल्या आठवड्यात फडणवीस यांनी ‘पेन ड्राइव बॉम्ब’च्या माध्यमातून राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात जबाब घेण्यासाठी ठाकरे-पवार सरकारच्या पोलिसांनी फडणवीस यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीमध्ये आरोपींना विचारण्याचे प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांना विचारल्याची भाजपची तक्रार होती.
फडणवीस म्हणाले की प्रश्न कोणी बदलले कसे बदलले का बदलले याची पूर्ण माहिती मला आहे पण मला त्याची अडचण नाही मी स्वतः वकील आहे. कायद्याने कसे लढायचे ते मला माहिती आहे. शिवाय मी कोणत्या घरातून येतो हे प्रश्न बदलणार यांना माहिती नाही तुरुंगाची भीती बाळगणारे आम्ही नाही. माझ्या वडिलांना कोणताही दोष नसताना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं होतं माझ्या काकूंना अठरा महिने तुरुंगवास झाला होता. तुरुंगाच्या भीतीने जनतेची लढाई मी सोडणार नाही.
तत्पूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले की पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यांना प्रश्नावली पाठवली होती. विरोधी पक्षनेत्यांना काही कारणामुळे त्याचे उत्तर नाही देता आला नाही. म्हणून पोलिसांनी या संदर्भात तुमचा जबाब द्या असे म्हटले. हा जबाब पोलीस स्टेशन मध्ये घ्यायचा का घरी घ्यायचा याची चर्चा झाली. त्यानंतर तो जबाब घरी घ्यायचे ठरले. त्याप्रमाणे तो घेतला गेला.
“विरोधी पक्षनेत्यांना जी नोटीस पाठवली ती त्यांना आरोपी म्हणून पाठवलेली नाही. विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणण्याचा, फसवण्याचा वगैरे असा अजिबात संबंध नाही. आपल्याला विनंती आहे की हा विषय आपण या ठिकाणी थांबवावा,” असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
Thackeray-Pawar do not know from which house I come
महत्त्वाच्या बातम्या
- सफाई कामगार झाला आमदार; संत कबीर नगरच्या गणेश चंद्र चौहान यांची कथा
- बांकेबिहारी मंदिरात रंगांची होळी आज सुरू होणार
- बारावी रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती, प्राध्यापकाला अटक, तीन विद्यार्थी सामील
- वॉलेटवर वर्ग केलेल्या कोट्यवधींच्या बिटकॉईनसाठी आरोपींकडे पासवर्डबाबत कसून चौकशी; पाटील, घोडे यांच्या कार्यालयाची झाडाझडती