• Download App
    धनुष्यबाण कोणाचे? : ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश; अन्यथा निर्णय घ्यायला निवडणूक आयोग मोकळाThackeray group ordered to submit documents by Saturday afternoon

    धनुष्यबाण कोणाचे? : ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश; अन्यथा निर्णय घ्यायला निवडणूक आयोग मोकळा

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : धनुष्यबाण कोणाचे?, याचा निर्णय उद्या शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय निवडणूक आयोग घेण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने उद्या दुपारी 2.00 वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा निर्णय द्यायला निवडणूक आयोग मोकळा राहणार आहे. Thackeray group ordered to submit documents by Saturday afternoon

    एकनाथ शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करू शकत नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी स्वेछेने पक्ष सोडला आहे, अशी भूमिका ठाकरे गटाने आजच्या सुनावणीत मांडली. पण कागदपत्रे सादर करण्यासाठी वाढीव मुदत मागितली. निवडणूक आयोगाने वाढीव मुदत मान्य केली नाही तर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश ठाकरे गटाला दिले.

    निवडणूक आयोगाने पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना ८ ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. ठाकरे गटाचे कोणतेही उत्तर आले नाही, तर या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही निवडणूक आयोगाने पत्रात स्पष्ट केले आहे.

     शिंदे मुख्य नेतेपदी

    शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे’’ असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता असल्याने या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.

     शिंदे गटाची ताकद

    शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार, १८ पैकी १२ खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १४४ पक्षाचे पदाधिकारी आणि ११ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. या दाव्याच्या पुष्टर्थ प्रतिज्ञापत्र आणि अन्य कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत.

    Thackeray group ordered to submit documents by Saturday afternoon

    महत्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ