• Download App
    ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस, ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून आंदोलनाचा विनायक मेटे यांचा इशारा|Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government

    ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस, ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून आंदोलनाचा विनायक मेटे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघषार्ला यश आले होते. पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले.Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government

    सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे.



    पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही निर्णय न घेणारे हे ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या म्हशीला आता टोचण्यासाठी शिवसंग्राम संघटनेसह मराठा समाजाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. ठाकरे सरकारला आम्ही 2 सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर, 2 सप्टेंबरला राज्यभर धरणे आंदोलनं, त्यानंतर मेळावे व मोर्चे काढण्यात येतील.

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी केला.

    Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

    राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा