• Download App
    ठाकरे - आंबेडकर युती; महाविकास आघाडीत चौथा गडी; जागावाटपात वाट्यात घाटा, की घाट्यात वाटा?? Thackeray - Ambedkar Alliance; forth partner in MVA may shrink seat sharing amongst them

    ठाकरे – आंबेडकर युती; महाविकास आघाडीत चौथा गडी; जागावाटपात वाट्यात घाटा, की घाट्यात वाटा??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अखेर बहुचर्चित ठाकरे – आंबेडकर युती अस्तित्वात आली. ती मुंबई महापालिकेपुरती असल्याचे जरी जाहीर झाले असले, तरी मूळातच महाराष्ट्राची सत्ता जाताच सैल झालेल्या महाविकास आघाडीत आधीच तीन गडी असताना चौथा गडी आला आहे. मग या चौघांमध्ये जागा वाटपाचा वाट्यात घाटा तयार होतो की या चौघांना घाट्यातला वाटा उचलावा लागतो होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Thackeray – Ambedkar Alliance; forth partner in MVA may shrink seat sharing amongst them

    निम्म्या जागांसाठी ठाकरेंचे भाजपशी भांडण

    आज प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करणारे उद्धव ठाकरे एकेकाळी भाजपशी युतीच्या जागवाटपाच्या मुद्द्यावर निम्म्याला निम्म्या जागा हव्यात, असे म्हणून भांडत होते. विधानसभेच्या 151 जागांवर अडून बसले होते. त्यामुळे शिवसेना – भाजप युती तुटली तुटली होती. पण आज त्याच उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रकाश आंबेडकर यांना तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत चौथा भिडू म्हणून घेतले आहे. मग या चौघांमध्ये मुंबई महापालिका अथवा अन्य महापालिका, जिल्हा परिषदा आणि महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा यामध्ये समसमान जागावाटप होईल, की जागा वाटपात शिवसेना – भाजप युतीत जसा दुहेरी संघर्ष झाला त्यापेक्षा दुप्पट म्हणजे चौघांचा संघर्ष होईल??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    मुंबई महापालिकेत अखंड शिवसेनेची एकहाती सत्ता होती. 2018 मध्ये भाजपने अखंड शिवसेनेला जोरदार टक्करही दिली होती. भाजप आणि शिवसेनेत दोन – पाच जागांचेच अंतर राहिले होते. म्हणजे शिवसेना पूर्ण बहुमतापेक्षा प्रथम क्रमांकाचा पक्ष होता. पण ती अखंड शिवसेना होती.

    दुभंगलेली शिवसेना, घटलेली वंचित आघाडी

    आता दुभंगलेली शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे. याचा अर्थ जागावाटपात आणि मतांच्या टक्केवारीत घाट्यात वाटा उचलावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे करून काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कसे आणि किती पाडले?, याची आकडेवारी मराठी माध्यमांनी दिली आहे. पण त्यावेळी देखील वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम या दोन पक्षांची युती होती. आणि आता ती युती नाही. त्या ऐवजी वंचित बहुजन आघाडीचा लंबक एआयएमआयएम पक्षाकडून सरकून थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला आहे. त्यामुळे जशी शिवसेना अखंड राहिली नाही तशीच वंचित बहुजन आघाडी ही देखील ताकदीच्या बाबतीत अखंड राहिलेली नाही. त्यामुळेच दोन क्षीण झालेल्या शक्तींची ही युती आहे, असे आज वास्तवातले चित्र आहे.

    त्यामुळे मुंबई महापालिका असो अथवा अन्य महापालिका आणि जिल्हा परिषदा किंवा अगदी विधानसभा या सर्व निवडणुका होईपर्यंत ठाकरे – आंबेडकर युती टिकली, महाविकास आघाडी पण टिकली तरी जागा वाटपात मात्र प्रत्येक पक्षाला घाट्यातलाच वाटा मिळणार आहे. कारण मर्यादित जागा चार पक्षांमध्ये वाटल्या जाणार आहेत आणि त्यातही क्षीण झालेली शिवसेना आणि क्षीण झालेली वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीतून वाट्यात घाटा तयार होणार आहे, हे निदान आजचे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे 23 जानेवारी 2023 चे तरी वास्तव राजकीय चित्र आहे.

    हे वास्तव चित्र शरद पवार जसेच्या तसे स्वीकारणार की स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र मार्ग आखणार??, यावर महाराष्ट्राचे बरेच राजकारण अवलंबून आहे!!

    Thackeray – Ambedkar Alliance; forth partner in MVA may shrink seat sharing amongst

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस