• Download App
    टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आरोपी तुकाराम सुपे निलंबित। TET exam scam case: State Examination Council Commissioner accused Tukaram Supe suspended

    टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आरोपी तुकाराम सुपे निलंबित

    तसेच टीईटी परीक्षेतल्या गैर प्रकाराची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. TET exam scam case: State Examination Council Commissioner accused Tukaram Supe suspended


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मुख्य राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आरोपी तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आले आहे.सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

    तसेच टीईटी परीक्षेतल्या गैर प्रकाराची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राथमिक अहवाल सात दिवसांच्या आत तर सविस्तर अहवाल १५ दिवसांत देण्याचे आदेशही या समितीला देण्यात आले आहेत.



    सुपे यांच्या घरात 2 कोटींची रोकड आणि दागिने सापडेल आहेत.

    २०१९ -२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना दि.१६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत.

    निलंबनाच्या आदेशात नेमक काय म्हटले

    निलंबनाचा आदेश जेवढे दिवस अंमलात असेल तोपर्यंत सुपे हे पुणे येथे राहतील.दरम्यान त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. जर नोकरी स्वीकारली तर सुपे गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही निलंबनच्या आदेशात म्हटले आहे.

    TET exam scam case: State Examination Council Commissioner accused Tukaram Supe suspended

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shaktipeeth Expressway शक्तिपीठ मार्गावरून फडणवीसांच्या धमकीमुळे पवारांची झोप उडाली; पण मोदींनी त्यात लक्ष घातल्यावर पवारांचे काय उडेल??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election result 2025 अजितदादांना नको असलेले चंद्रराव तावरे विजयी; माळेगावच्या कारखान्यात चालणार नाही मनमानी!!