प्रतिनिधी
नागपूर : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी स्वतः फडणवीस यांनी काही काळ चालवली. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून तो जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. Test drive of Shinde – Fadnavis on Samriddhi Highway
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच कारने शिर्डीकडे रवाना झाले. मर्सिडिज कारमधून दोन्ही नेत्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहे. नागपूरहून शिर्डीपर्यंत दोन्ही नेते एकत्र प्रवास करत आहे.
दरम्यान, ‘मी आज समृध्दी महामार्गाची पाहणी करणार आहे. 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याच्या नियोजनाची तयारीच आढावा घेणार आहे. मला अतिशय आनंद आहे. राज्यातल्या गेम चेंजर प्रकल्पावर आम्ही काम केलं आहे. काम सुरू झालं तेव्हा देखील मी या खात्याचा मंत्री होतो आता लोकार्पण होत असताना मुख्यमंत्री आहे याचा मला आनंद आहे. मुंबई नागपुर जवळ येईल, उद्योग वाढलतील. या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं याच समाधान मला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळावर बोलताना दिली.
ठाकरे – पवार सरकार अस्तित्वात असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामतीचा दौरा केला होता त्यावेळी अजितदादांनी उद्धव ठाकरे यांना शेजारी काही वेळ गाडी चालवली होती. त्यावेळी देखील मुख्यमंत्र्यांचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हातात अशी चर्चा झाली होती.
Test drive of Shinde – Fadnavis on Samriddhi Highway
महत्वाच्या बातम्या