विशेष प्रतिनिधी
मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. Tenth and twelfth grade students will get discounted sports marks
कोविडमुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन २०२१-२२ या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत.
तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन २०२१-२२ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन २०२१-२२ च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Tenth and twelfth grade students will get discounted sports marks
महत्त्वाच्या बातम्या
- विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीची परिस्थिती
- सैन्य पाठवून रशियाची युक्रेन मध्ये फुटीरांना उघड मदत युक्रेन लष्कर व फुटीरतावादी यांच्यातील युद्ध प्रखर
- शिवसेना – भाजप भांडताहेत, काँग्रेस – राष्ट्रवादीवाले बाहेरून मजा पाहताहेत!!; माजी खासदार शिवाजी मानेंनी दाखवला आरसा!!
- नारायण राणेंबद्दल महिला आयोगाकडे तक्रार मुंबईच्या महापौरांच्या अर्जावर कार्यवाही सुरू