वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाचे कारण सांगून गलेलठ्ठ पगार घेणारे आणि बॉसला नावडत्या व्यक्तींना नारळ देण्याचा नवा प्रघात सुरु झाला आहे. पण, कमी पगारात मनुष्यबळ मिळवता येईल, हा होरा मात्र अनेकांचा चुकला आहे. दुसरीकडे डॉक्टर, चिकित्सकांच्या जागांसाठी पुणे जिल्हा परिषदेने गलेलठ्ठ पगाराची बंपर ऑफर देताच अर्जावर अर्ज आले. विशेष म्हणजे चक्क 10 एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्तीही ग्रामीण भागात झाली. Ten MBBS doctors assigned to rural hospitals
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यासाठी एमबीबीएस डॉक्टर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ९० हजार रुपये पगाराची मोठी ऑफर दिल्यानंतर मंगळवार ता.२०) रोजी चमत्कार झाला. पहिल्याच दिवशी दहा एमबीबीएस डॉक्टर मिळाले असून, त्यांना नियुक्तीपत्र दिली आहेत.
कोरोना महामारीत ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर, कोविड हाॅस्पिटलसाठी जाहिरात देऊनही एमबीबीएस आणि एमडी दर्जाचे डॉक्टर मिळत नव्हते. जिल्हा परिषदेने दोन दिवसापूर्वी एमबीबीएस डॉक्टरसाठी तब्बल नव्वद हजार रुपये आणि एमडी डाॅक्टरसाठी तब्बल दीड लाख पगार देण्याची ऑफर देऊन देशातील बारा राज्यांमध्ये जाहिरात केल्यानंतर ३० एमबीबीएस डॉक्टरांनी प्रतिसाद दिला.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र कोरोना हॉस्पिटल मध्ये दहा एमबीबीएस डॉक्टरांनी तत्काळ हजर होण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सायंकाळी त्यांना तत्काळ नेमणूक पत्र देण्यात आले. हे सर्व डॉक्टर हे महाराष्ट्रातील आहेत . पुढील तीन महिन्यांसाठी या डॉक्टरांच्या नेमणुका आहेत. आणखी दोन दिवस ही डॉक्टरांची भरती सुरू राहणार आहे. पात्रता पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ नेमणूक पत्र दिले जाईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.