- तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त व परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक मुद्यांवर ती मतं व्यक्त करत असते. अभिनयाच्या बाबतीतही तिला तोड नाही.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर स्थिती गंभीर आहेत. रूग्णांचा आणि मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. रूग्णालयांत पुरेसे बेड नाहीत, पुरेसा ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर औषध नाही, रूग्णवाहिका नाहीत.दुसरीकडे रेमडेसिवीर आणि लसींवरून राजकारण सुरू असलेले पाहायला मिळतेय.यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं संताप व्यक्त केला आहे.राजकारण ही कोरोनापेक्षा भयानक कीड आहे अशी टीका तिनं केली आहे.Tejaswini Pandit post on politics in country amid corona pandemic
इन्स्टा स्टोरीवर तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. सगळ्यात मोठी ‘कीड’ जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे ‘राजकारण’… ही ‘कीड’ कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वषार्नुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या ‘कीड’पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच….काळजी घ्या,असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडिया हे लोकांशी कनेक्ट होणासाठी अत्यंत तगडं माध्यम मानलं जात. अशातच अनेक सेलिब्रिटी सुद्धा आपले चित्रपटाचे प्रमोशन तसेच आपले व्यतिगत मत सुद्धा सोशल मीडिया द्वारे मांडतात. एखाद्या प्रसिद्ध नावाजलेला राजकारणी व्यक्ती असो, खेळाडू किंवा कलाकार असो त्याने केलेल्या एका पोस्टचा किंवा वक्तव्याचा प्रभाव तसेच चर्चा लोकांमध्ये रंगताना दिसते.