• Download App
    टाटा इन्स्टिट्यूटचा 3,750 उद्योगांशी करार‎,‎ 15000 विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार‎Tata institutes tie up with 3,750 industries

    टाटा इन्स्टिट्यूटचा 3,750 उद्योगांशी करार‎,‎ 15000 विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार‎

    प्रतिनिधी

    मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल‎ सायन्सेसशी राज्य शासनाने नुकताच सामंजस्य करार‎ केला‎ आहे. यामुळे राज्यातील बारावीच्या 15000 विद्यार्थ्यांना‎ शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध ‎होणार‎ आहे. त्याबरोबरच टाटा इन्स्टिट्यूटने ‎राज्यातील सुमारे 3500 उद्योगांशी ‎सामंजस्य करार केला आहे. Tata institutes tie up with 3,750 industries

    या योजनेंतर्गत ‎विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख‎ शिक्षणाच्या संधी‎ बरोबरच स्थानिकस्तरावरही रोजगाराच्या संधी ‎उपलब्ध असणार आहे.‎‎ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या‎‎ नामांकित मानद विश्वविद्यालय संस्थेच्या‎ ‘स्कूल‎ ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या‎ विभागाद्वारे‎ यूजीसी निकषानुसार पदविका आणि पदवी घेण्याची संधी उपलब्ध करून‎ देण्यात येणार‎ आहे. यासाठी ‘कमवा व शिका’‎ या तत्त्वावर‎ कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता‎ बारावीनंतर‎ प्रवेश घेऊ शकणार आहे.


    Ratan Tata म्हणाले, मला भारतरत्न देण्याची मोहीम थांबवा, देशाची सेवा करता येणे हे माझे भाग्यच!


    या संस्थेने‎‎ ‎अभ्यासक्रमाकरिता ३ हजार ७५० उद्योगांशी करार केला असून, विद्यार्थ्यांना‎ स्थानिकस्तरावर‎ त्यांच्या आवडीनुसार विषय‎ अथवा जॉबरोल‎ निवडण्याची सोय उपलब्ध‎ असणार आहे.‎ त्यामध्ये प्रामुख्याने अॅग्रिकल्चर,‎ ऑटोमोटिव,‎ चाइल्ड केअर, इलेक्टॉनिक्स,‎ लाइफ सायन्स,‎ रिटेल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अॅन्ड‎ आंत्रेप्युनरशिप,‎ टुरिझम अॅन्ड हॉस्पिटॅलिटी,‎ माहिती तंत्रज्ञान,‎ ‎ मीडिया व एंटरटेन्मेंट, बँकिंग‎ व वित्तीय क्षेत्र‎ यामधील संधींचा समावेश आहे.‎ अभ्यासक्रम‎ पूर्ण‎ करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल‎‎ क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित‎ प्रमाणपत्र‎ देण्यात येईल. यामध्ये पहिल्या‎ वर्षानंतर डिप्लोमा‎ कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर‎ ॲडव्हान्स डिप्लोमा‎ कोर्स तर तिसऱ्या‎ वर्षानंतर बॅचलर इन‎ व्होकेशनल‎ एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळणार आहे.

    Tata institutes tie up with 3,750 industries

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!