• Download App
    स्वर्णव सापडला म्हणून पाठ थोपटून घेतली पण अपहरणकर्ते अद्यापही मोकाट, पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हSwarnav's kidnappers question the efficiency of Pune police

    स्वर्णव सापडला म्हणून पाठ थोपटून घेतली पण अपहरणकर्ते अद्यापही मोकाट, पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

    पुण्याच्या बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातून स्वर्णव (डूग्गु) सतिष चव्हाण या चार वर्षीय मुलाचे  शाळेत जात आताना अपहरण करण्यात आले होते. आठ दिवसांनी अपहरकर्त्यांनी त्याला सोडले. पोलिसांनी आपली पाठ थोपटून घेतली. मात्र एक महिना झाला तरी अपरणकर्त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Swarnav’s kidnappers question the efficiency of Pune police


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्याच्या बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातून स्वर्णव (डूग्गु) सतिष चव्हाण या चार वर्षीय मुलाचे  शाळेत जात आताना अपहरण करण्यात आले होते. आठ दिवसांनी अपहरकर्त्यांनी त्याला सोडले. पोलिसांनी आपली पाठ थोपटून घेतली. मात्र एक महिना झाला तरी अपरणकर्त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    स्वर्णव सापडल्यावर पोलिसानी त्याच्या घरी जाऊन सत्कार देखील स्वीकारले. मात्र, अद्याप अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यात यश आलेले नाही. या घटनेला तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतरही पोलिसांना आरोपीचा माग काढता आलेला नाही. एकंदरीतच पोलिसांच्या ‘ह्युमन इंटेलिजन्स’ म्हणजे खबऱ्यांचे ‘नेटवर्क’ कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे.

    डॉ. सतीश किशनराव चव्हाण (वय 33, रा. बाणेर) यांचा मुलगा स्वर्णवचे अपहरण 11 जानेवारी रोजी झाले होते. डॉ सतीश आणि त्यांची पत्नी पेशाने डॉक्टर आहेत. स्वर्णवचे अपहरण झाल्यापासून त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात होता. त्याला पुनावळे येथील एका बांधकाम साईटवर सोडून देण्यात आले. सुदैवाने तो सुखरूप घरी परतला.

    त्याचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या दुचकीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. अपहरण करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या कुटुंबाशी संपर्क न साधल्याने अपहरणामागे नेमके कोण आहे याची माहिती समजत नव्हती. पोलिसांकडून सर्व प्रकारे तपास सुरू होता. स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहपोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे हे तपासावर बारीक लक्ष ठेवून होते.  मुलाचा काही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते.

    परंतु, सुदैवाने स्वर्णव सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तां, सह आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटूंबियांना धीर दिला. यावेळी बोलताना गुप्तां आणि डॉ शिसवे म्हणाले होते की, आरोपींबाबत महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. लवकरच आरोपीपर्यंत पोलीस पोचतील. परंतू, या घटनेला एक महिना उलटून गेला तरी अद्याप आरोपींचा सुगावा पोलिसना लागू शकलेला नाही.

    स्थानिक पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र या तपासादरम्यान पाहायला मिळाले. यासोबतच शहरातील बहुतांश भागात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी बंद असल्याचे देखील समोर आले. कारण स्वर्णवचे अपहरण करणारा दुचाकीचालक हा ज्या रस्त्याने गेला तर रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासत असताना काही रस्त्यांवरील सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा मार्ग काढणे पोलिसांना अडचणीचे गेले.
    या काळामध्ये पोलिसांना मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस तपास पथक गेले की त्या ठिकाणी अन्य टीम्स देखील पोचत होत्या. एकूणच या तपासामध्ये पोलीस गोंधळल्याचे पाहायला मिळाले.

    अलीकडच्या काळामध्ये पोलिसांचा तपास हा टेक्निकलक्या आधारे केला जात आहे. त्याचा उपयोग देखील होत आहे. त्यामधून गुन्हे देखील उघडकीस येत आहेत. मात्र अपहरण खून अशा आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस दलामध्ये पूर्वापार मदत करत असलेला खबऱ्या हा घटक अलीकडच्या काळामध्ये दुर्लक्षित झाला आहे.

    Swarnav’s kidnappers question the efficiency of Pune police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!