प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे, केवळ स्वराज्य रक्षक होते, असे विधान करीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वाद ओढवून घेतला होता. मात्र, अजितदादांवर तोंडसुख घेणाऱ्या शिंदे – फडणवीसांनीही पुरवणी मागण्यांच्या पुस्तिकेत संभाजी महाराजांचा उल्लेख फक्त स्वराज्यरक्षक असाच कायम ठेवल्याने विधिमंडळात त्याची जोरदार चर्चा रंगली. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करून “स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”, असा बदल केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. Swarajya rakshk dharmaveer chatrapati sambhji maharaj will be done in supplementary demands booklet of government of maharashtra
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ (मौजे तुळापूर ता. हवेली) आणि समाधी स्थळ स्मारक (वढू (बु.) शिरूर) येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम ४६ अन्वये विधान परिषदेत केले.
या विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली आणि समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि. पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Swarajya rakshk dharmaveer chatrapati sambhji maharaj will be done in supplementary demands booklet of government of maharashtra
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदार सफिया जुबेर म्हणाल्या- आम्ही राम-कृष्णाचे वंशज : अमीन खान म्हणाले – भारत धर्मनिरपेक्ष मानले जात नाही, हिंदू राष्ट्रातही कोणी मारणार नाही
- केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही
- आमदार अपात्र ठरले असते तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण