विशेष प्रतिनिधी
मुंबई : काळाची पाऊले ओळखत हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करत पर्यावरण संवर्धन साधत असताना शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने, मुंबई स्थित संपर्क संस्था आणि स्त्री आधार केंद्र, पुणे यांनी ८ व ९ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय दृक्श्राव्य माध्यमाद्वारे मंथन परिषद आयोजित केली आहे. या परिषदेतून राज्यस्तरीय कृती आराखड्याची निश्चिती होणार आहे. Sustainable Development while promoting environment conservationOnline Seminar on 8th and 9th February
ही परिषद ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान झूम या ऑनलाईन मंचावर पार पडेल. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून डॉ.नीलम गोऱ्हे परिषदेच्या अध्यक्ष असणार आहेत.
आशिया व जागतिक स्वयंसेवी संस्था विकास तज्ञ अजय झा, नवी दिल्ली, राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, अभिजीत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
यासह राज्यात हवामानबद्दल, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करणाऱ्या संस्था व तज्ज्ञ , प्रियदर्शिनी कर्वे, शुभदा देशमुख, शिरीष फडतरे, दिलीप गोडे, रमेश भिसे, संस्कृती मेनन, अपर्णा पाठक आणि विभावरी कांबळे, या परिषदेत विचार मांडणार आहेत. तज्ज्ञांच्या समन्वयातून व विचार मंथनातून हवामानबदल दुष्परिणाम रोखण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
Sustainable Development while promoting environment conservationOnline Seminar on 8th and 9th February
महत्त्वाच्या बातम्या
- येरवडा इमारत दुर्घटना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
- पत्नीच्या काेराेना मृत्यूची 50 हजारांची मदत चाेरट्यांनी पळविली, पाेलीसांनी माणुसकी दाखवित वर्गणी काढून वृध्दाला दिली रक्कम
- समान नागरी कायद्याच्या संहितेचा मुद्दा कायदा आयाेगाकडे, कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची लाेकसभेत माहती
- गाेळीबाराच्या घटनेनंतर असुद्दीन ओवेसी यांना झेड सुरक्षा