• Download App
    ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून बिस्मिल्ला ए रहमान ए रहीम म्हणत सुषमा अंधारेंनी समजावले इस्लामचे 5 फर्ज! Sushma Andha explained the 5 duties of Islam

    ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून बिस्मिल्ला ए रहमान ए रहीम म्हणत सुषमा अंधारेंनी समजावले इस्लामचे 5 फर्ज!

    प्रतिनिधी

    मुंबई : ज्या शिवसेनेच्या व्यासपीठावरून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रखर हिंदुत्व मांडायचे, त्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व्यासपीठावरून पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बिस्मिल्ला ए रहमान ए रहीम म्हणत इस्लामचे 5 फर्ज समजावून सांगितले आहेत. Sushma Andha explained the 5 duties of Islam

    उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली, तेव्हापासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, यामुळे एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या व्यासपीठावर थेट इस्लामचा प्रचार केला आहे. त्यासाठी चक्क बिस्मिल्ला ए रेहमान ए रहीम…’ हा आयात म्हटला.



    सोशल मीडियावर टीकेची झोड 

    सुषमा अंधारे यांनी थेट शिवसेनेच्या व्यासपीठावरून ‘बिस्मिल्ला ए रेहमान ए रहीम…’ हा आयत म्हणून दाखविल्याचा आणि इस्लाममधील ५ फर्ज समजावून सांगितल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

    त्यामुळे सोशल मीडियातून उद्धव ठाकरे गटावर टीकेची प्रचंड झोड उठली असून अनेकांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे पुरते इस्लामीकरण केल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, ‘ही ज्वलंत हिंदुत्वाचा वसा सांगणाऱ्या जनाब सेनेची सभा चालली आहे…अस्सलाम वालेकुम लाचारांनो…’  असे म्हटले आहे.

    तर काही जणांनी ‘ शिवसेनेच्या व्यासपीठा वरून इस्लामचा प्रचार ….बाळासाहेबांचा प्राण तळमळला ……या साठीच अट्टाहास केला होता का कट्टर हिंदुत्वाचा’, असे म्हटले आहे.

    Sushma Andha explained the 5 duties of Islam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!