गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता.Suresh Mhatre joins NCP
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. दरम्यान गुरुवारी ( आज ) त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.यावेळी सुरेश म्हात्रे म्हणाले की , राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आपण पूर्णपणे सार्थ ठरवू आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू.
कोण आहेत सुरेश म्हात्रे
केंद्रीय पंचायत राज मंत्री खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून सुरेश म्हात्रे परिचित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युती असतांनाही म्हात्रे यांनी मंत्री पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते. तेव्हापासून म्हात्रे हे चर्चेत होते. दरम्यान आता सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधले आहे.