विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्या सगळीकडेच पक्षप्रवेशाचे वारे वाहतात. यामध्ये कलाकार मंडळी मागे नाही येत.. नुकताच बिग बॉस फेम अभिनेत्री मेधा धाडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्याआधी दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या गौरी यांनी यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. Surekha Punekar left the NCP and join the BRS
आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाला राम राम करत हैदराबादच्या भारत राष्ट्र समितीत तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
पक्षप्रवेशा आधी सुरेखा पुणेकर यांनी हैदराबाद इथं जाऊन विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. सुरेखा पुणेकर यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.मोहोळ किंवा देगूलूरमधून BRS च्या तिकिटावर सुरेखा पुणेकर लढण्याची शक्यता आहे.
मराठी बिग बॉस सीजन दोन मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. आणि त्या शोमुळे तर चांगल्याच चर्चेतही आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. आता मात्र सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आणि बी आर एस चा झेंडा हाती घेतला आहे.
Surekha Punekar left the NCP and join the BRS
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
- आधी पक्षातून हकालपट्टी नंतर अटकही, ‘द्रमुक’च्या प्रवक्त्याला भाजपा नेत्या खुशबू सुंदरवर केलेली वादग्रस्त टिप्पणी भोवली!
- घरात बसणार्यांना मोदी-शाह काय कळणार? अकोल्यात फडणवीसांची बोचरी टीका
- ‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!