• Download App
    SUPPORT SAMEER WANKHEDE: Nawab Malik tweet 'Sameer Dawood Wankhede'! Mudslinging on Wankhede's personal life; Share old photo of alleged first wedding;public says Minister do your work-badly trolled

    SUPPORT SAMEER WANKHEDE : नवाब मालिकांचे ट्विट ‘समीर दाऊद वानखेडे’ ! वानखेडेंच्या वैयक्तीक आयुष्यावर चिखलफेक ; कथित पहिल्या लग्नाचा जुना फोटो शेअर ;नेटकरी भडकले मंत्री साहेब ट्रोल

    • SUPPORT SAMEER WANKHEDE ट्विटरवर ट्रेंड

    • राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांचा अत्यंत तरुण वयातील हा फोटो आहे.

    • नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जुना फोटो ट्विट केला आहे. त्यावर पैचान कौन? असा सवाल केला आहे.

    • यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा म्हणत समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर. पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल. SUPPORT SAMEER WANKHEDE: Nawab Malik tweet ‘Sameer Dawood Wankhede’! Mudslinging on Wankhede’s personal life; Share old photo of alleged first wedding;public says Minister do your work-badly trolled

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या रडारवर असल्याचंच चित्र दिसत आहे. नवाब मलिक सतत ट्विटरवरून समीर वानखेडेना टार्गेट करत आहेत. त्यांनी आज केलेल्या ट्विट नंतर मात्र अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

    नवाब मलिक या ट्विटनंतर ट्रोल होतायेत. एका खात्याच्या मंत्र्याला हे शोभतं का ? तर मंत्री साहेबांना सरकारी काही काम नाही का ?असे सवालही काहींनी विचारले आहेत.

    क्रूझशिप ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आहेत.

    जहाजावर टाकलेल्या धाडीवरून आणि आर्यन खान अटकेवरून विविध प्रश्न उपस्थित केले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कारवाई मागील भूमिकेवर शंका उपस्थित करत आरोप केले आहेत.

    नवाब मलिक यांनी सोमवारी आणखी एक ट्वीट करत एक बृहन्मुंबई महापालिका असं नाव असलेला कागद शेअर केला आहे.

    हा कागद समीर वानखेडे यांचं जन्मप्रमाणपत्र असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यावरून आता मलिकांनी वानखेडेंना लक्ष्य केलं आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून, अनुसूचित जाती अर्थात एससी (SC) प्रवर्गातून त्यांची निवड झालेली आहे.

    मलिकांना समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करायचा असेल. समीर वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार केलं, याकडेही त्यांना लक्ष्य वेधायचं असेल. मात्र यामागचं नेमकं कारण मलिकांनी भाष्य केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

    SUPPORT SAMEER WANKHEDE : Nawab Malik tweet ‘Sameer Dawood Wankhede’! Mudslinging on Wankhede’s personal life; Share old photo of alleged first wedding;public says Minister do your work-badly trolled

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!