• Download App
    पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्याSuicide by strangulation of female police inspector in Pune police force

    पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

    शिल्पा चव्हाण यांनी विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर भागात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.Suicide by strangulation of female police inspector in Pune police force


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.शिल्पा चव्हाण यांनी विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर भागात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे.



    या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या.गुन्हे शाखेत नेमणुक होण्यापुर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. दरम्यान, चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

    Suicide by strangulation of female police inspector in Pune police force

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!