• Download App
    साखर कारखाना घोटाळा, जावयाला कॉन्ट्रॅक्ट; राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी - इन्कम टॅक्सचे छापे Sugar Factory Scam, Son-in-law Contract; ED - Income Tax raids on NCP leader Hasan Mushrif's house

    साखर कारखाना घोटाळा, जावयाला कॉन्ट्रॅक्ट; राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी – इन्कम टॅक्सचे छापे

    प्रतिनिधी

    कोल्हापूर : साखर कारखान्यातील घोटाळा, जावयाला कॉन्ट्रॅक्ट या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापे घातले आहेत. Sugar Factory Scam, Son-in-law Contract; ED – Income Tax raids on NCP leader Hasan Mushrif’s house

    आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याच्या घोटाळा प्रकरणात ईडीने छापे घातल्याचे माहिती आहे. गडहिंग्लज, कोल्हापूर आणि पुणे परिसरात ईडी आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी आज सकाळी 6.00 वाजताच पोहोचले आणि कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली.

    यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मधल्या निवासस्थानी ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाचे 20 अधिकारी छापे घालण्याचे काम करत आहेत. या सर्वांनी सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.


    हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेखातून अपमान


    हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मात्र हसन मुश्रीफांच्या 158 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे पुरावेच आपण ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिल्याचे म्हटले आहे.

    असून मुस्लिम यांनी आपल्या जावयाला 1500 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट दिले. त्यामध्ये घोटाळा केला. त्याचा हिशेब घेतला जाईल, असे किरीट सोमय्या म्हणावे इतकेच नाही तर आज हसन मुश्रीफ यांचा नंबर लागला आहे अस्लम शेख या काँग्रेसच्या मंत्र्यांनी देखील पुढची तयारी ठेवावी, असा इशारा केली सोमय्या यांनी दिला आहे.

    Sugar Factory Scam, Son-in-law Contract; ED – Income Tax raids on NCP leader Hasan Mushrif’s house

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य