• Download App
    भूषण देसाईने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...Subhash Desais first reaction after Bhushan Desai entered Eknath Shindes Shiv Sena

    भूषण देसाईने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    Subhash desai

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईचा पक्षप्रवेश झाला आहे.

    प्रतिनिधी

    मुंबई :  उद्धव ठाकरे गटाला आज आणखी एक धक्क बसला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. Subhash Desais first reaction after Bhushan Desai entered Eknath Shindes Shiv Sena

    “माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. असं सुभाष देसाईंनी म्हटलं आहे.

    याशिवाय, ‘’शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.” असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत.


    ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात; गजानन कीर्तीकरांचा मुलगा ठाकरे गटात; सुभाष देसाईंचा मुलगा शिंदे गटात!!


    एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पाडल्यानंतर. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती अद्याही थांबलेली नाही. आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे  माजी उद्योगमंत्री आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

    … म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला – भूषण देसाई

    भूषण देसाईंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरा शब्द माझ्यासमोर आलेला मला आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. ते वाढवत आहेत. यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आधीपासून एकमेकांबरोबर काम केलं आहे. मी एकनाथ शिंदे यांना जवळून काम करताना बघितलं आहे. त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांची निर्णयक्षमता पाहून मी त्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.”

    Subhash Desais first reaction after Bhushan Desai entered Eknath Shindes Shiv Sena

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!