• Download App
    पुरामुळे एमएचटी-सीईटी परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेणार , उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती|Students who missed the MHT-CET exam due to floods will retake the exam, Higher and Technical Education Minister Uday Samant

    पुरामुळे एमएचटी-सीईटी परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेणार , उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: राज्यात अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. या पुराचा फटका एमएचटी-सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. पुरामुळे एमएचटी-सीईटी परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.Students who missed the MHT-CET exam due to floods will retake the exam, Higher and Technical Education Minister Uday Samant

    मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. मंगळवारी सकाळी औरंगाबाद येथील हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूला पर्यटक, विद्यार्थी अडकून पडले होते. त्यामुळे औरंगाबाद शहरात परीक्षेचे सेंटर असल्याने सुमारे २१५ विद्यार्थी परीक्षेस मुकले आहेत. त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहेत.



    परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यर्थ्यांनी काळजी करू नये, असे म्हटले आहे.यासंदर्भात ट्विट करून सामंत यांनी म्हटले आहे की, राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यर्थी परीक्षा देवू शकले नाहीत

    अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यर्थ्यांनी काळजी करू नये, असेही या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

    औरंगाबाद नांदेडसह मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली होती. शहरासह अनेक गावांतील नद्या नाल्यांना पूर आल्याने गावाचा व शहराचा संपर्क तुटला होता.

    त्यामुळे दैनंदिन कामकाजासह सध्या सुरू असलेल्या एमएचटी-सीईटी या परीक्षेस विद्यर्थ्यांना उपस्थित राहता आले नाही, त्यामुळे विद्यर्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या विद्यर्थ्यांना या परीक्षा देता आल्या नाहीत, त्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत.

    Students who missed the MHT-CET exam due to floods will retake the exam, Higher and Technical Education Minister Uday Samant

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!